क्रीडा स्पर्धांद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी 

क्रीडा स्पर्धांद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी 

काटोल, (जि. नागपूर) : ग्रामीण भागातील शाळांनी क्रीडास्पर्धाचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना संधी मिळेल, असे प्रतिपादन वैशाली जयंत टालाटुले यांनी केले. दी जनसेवक संस्था रिधोराद्वारे संस्थेचे संस्थापक विठ्ठलराव टालाटुले यांच्या 84व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेअंतर्गत येत असलेल्या मेटपांजरा, डोरली, रिधोरा, ढवळापूर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचा विकास व्हावा, या हेतूने दरवर्षी एका शाळेत निवासी क्रीडा, सांस्कृतिक शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा ढवाळापूर येथील ग्रामविकास विद्यालयात या शिबिराचे आयोजन केले होते. 

उद्‌घाटनचे अध्यक्ष प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे, प्रमुख पाहुणे विजय वरफडे तर अतिथी म्हणून संस्थापक विट्ठलराव टालाटुले, डॉ. अनिल ठाकरे, डॉ. वैशाली टालाटुले, जयंत टालाटुले उपस्थित होते. या शिबिरांतर्गत कबड्डी, व्हॉलिबॉल, खो-खो व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मेटपांजरा शाळेतील मुला-मुलींनी कबड्डीत बाजी मारली व व्हॉलिबॉलमध्ये मेटपांजरा येथील मुले तर डोरली येथील मुलीचा संघ विजयी ठरला. खो-खोमध्ये रिधोरा येथील मुले तर ढवळापूर येथील मुली अव्वल ठरले.

शासकीय नोकरीत खेळाडूंना आरक्षण
चार शाळांतील चारशे विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होते. पोलिस, सैनिक व इतर क्षेत्रातील शासकीय नोकरीत खेळाडूंना आरक्षण असते, त्यात संधी मिळावी यासाठी असे खेळ ग्रामीण स्तरावर आयोजित केले जावेत, असे सर्व पाहुण्यांनी आपले मत व्यक्त केले. समारोपाला संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, परिसरातील सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी सहभागी होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक पुष्पाकर पवार, संचालन रेवतकर तर आभार मोरेश्‍वर वाघ यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com