अतिक्रमित जागेवरील घर हक्काचे

सुधीर बुटे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

अतिक्रमित जागेवरील घर हक्काचे
काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे. यासाठी विशेष समिती गठित होणार आहे. काटोल शहरातील बेघरांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासोबत नगर परिषद सदस्यांवर असलेल्या अनिश्‍चिततेचे मळभही दूर होणार आहे.

अतिक्रमित जागेवरील घर हक्काचे
काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे. यासाठी विशेष समिती गठित होणार आहे. काटोल शहरातील बेघरांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासोबत नगर परिषद सदस्यांवर असलेल्या अनिश्‍चिततेचे मळभही दूर होणार आहे.
काटोल शहराचा नियोजनबद्ध विकास आराखडा आखण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात निवासी संकुलाच्या योजनेचा यात समावेश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे या निर्णयानंतर मत व्यक्त करण्यात येत आहे. काटोलमधील संगमा नगर, मरामय नगर, अर्जुन नगर, मटण मार्केट, मांगपूर, सावरगाव रोड, पेठ बुधवार, हेटी या भागात गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या जागेवर तात्पुरता झोपड्या बांधून नागरिक राहत आहेत. अशा नागरिकांनाही या निर्णयामुळे मालकीचे घर मिळेल. नदीकाठावरीलही अतिक्रमणधारकांना याचा लाभ मिळण्याची शक्‍यता आहे. नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमित जागा रस्ता, गटारे, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधेसाठी नगर परिषदेला हवी असेल ती जागा अतिक्रमण केलेला व्यक्ती विनामूल्य प्रदान करून लेखी देईल तेव्हाच त्याची उर्वरित जागा ही नियमनुकूल होईल. या निर्णयामुळे सर्वांना हक्काचा निवास प्राप्त होणार आहे.
काटोल नगर परिषदेच्या हद्दीतील घरकुले नियमित होणार असल्याने अनेकांना याचा दिलासा मिळणार आहे. काटोल शहरात विदर्भातील सर्वांत मोठी घरकुल योजना राबविली जात आहे. याशिवाय अतिक्रमणाच्या जागेचा वाद सुटल्याने नगर परिषदेतील वाद संपुष्टात येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला हक्काचा निवास असावा. या योजनेत नगर परिषद काटोल अग्रेसर आहे. शासनाने नवीन अध्यादेशामुळे नगरीत घरकुल योजना अधिक गतिमान होईल.
- चरणसिंग ठाकूर, सत्तापक्ष नेते, न. प. काटोल

Web Title: encroached land news