कुख्यात शेराच्या दहशतीचा करुण अंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

नागपूर : नागपुरातील कुख्यात गुंड शेरा ऊर्फ सुमित चव्हाण याच्या दहशतीचा करुण अंत झाला. शेराचा उपचारादरम्यान आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली. निखिल ऊर्फ गोलूसिंह मलिये (वय 28, बाजीप्रभू अपार्टमेंट, सुर्वेनगर) आणि निखिल विलास खरात (वय 22, भांगे ले-आउट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुभम नावाचा आरोपी अद्याप फरार आहे.

नंदनवनमधील डबल हत्याकांडातील मुख्य आरोपी शेरा चव्हाण हा गुरुवारी दुपारी प्रतापनगर रिंग रोडवरील जयस्वाल बारमध्ये दारू पिण्यास गेला होता. त्याच्यासोबत गॅंगमधील अजिंक्‍य दिनकर आणि समीर वैद्य सोबत होते. तर निखिल खरात आणि निखिल मलिये हे काही साथिदारांसह जयस्वाल बारमध्ये आले. निखिलने अजिंक्‍यला सिगारेट आणण्यास सांगितले. अजिंक्‍यने सिगारेट दिल्यानंतर परत जात असताना शेराला बोलावले. जुन्या वैमनस्यातून त्याला शिवीगाळ केली. घाबरलेल्या शेराने काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, निखिल मलिये याने लगेच पाठीमागे लपविलेला सुरा शेराच्या पोटात खुपसला. त्यानंतर साथिदारांनी विटाने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला. शेराला रक्‍ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर खरात हा साथिदारासह पळून गेला. शेरावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज शनिवारी सायंकाळी शेराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The End of the Injury