लाचखोर कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

अकोला : महानगर पालिकेच्या बांधकाम विभागात मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यास कामाचे बील मंजूर करण्यासाठी 30 हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष बाशीम बायपास चौकातील चहा टपरीजवळ ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (ता. 12) दुपारी 2 वाजता दरम्यात करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारकर्त्या ठेकेदाराचे त्याने केलेल्या तीन कामांचे 8 लाख 50 हजार रूपयांचे बील मंजूर करण्यासाठी तयार करून ते पुढे पाढविण्याकरिता मदत करण्याकरिता तक्रारकर्त्या ठेकेदारास मनपाचा कनिष्ठ अभियंता सईद अहमद शेख मुसा (वय 41) याने 40 हजार रूपयांची लाच मागितली होती. यातील 30 हजार रूपये आधी तर बील मंजूर झाल्यानंतर 10 हजार रूपये नंतर असे ठरले होते. मात्र तक्रारकर्त्या ठेकेदाराने लाच देण्याआधी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे बुधवारी (ता. 12) दुपारी 2 वाजता दरम्यान बाशीम बायपास चौकातील चहाच्या टपरीजवळ लाचखोर कनिष्ठ अभियंता सईद अहमद शेख मुसा यास पैसे स्विकारण्यासाठी बोलावण्यात आले होते.

तडजोडीमधील 30 हजार रूपयांचा पहिला स्विकारण्यासाठी आलेल्या कनिष्ठ अभियंता सईद अहमद शेख मुसा यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस उप अधीक्षक संजय गोर्ले, पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण, गजानन दामोदर, सुनील राऊत, संतोष दहीहंडे, राहुल इंगळे, सुनील येलोने, सचिन धात्रक,प्रवीण कश्यप यांनी केली.

Web Title: engineer caught by ACB while collecting bribe