दुचाकी खरेदी प्रकरणात अभियंत्याला फसविले

file photo
file photo

नागपूर, : दुचाकी खरेदी प्रकरणात अज्ञात आरोपीने एका अभियंत्याची 35 हजार 340 रुपयांनी फसवणूक केली.
इम्पीरियल सिटी, कोथेवाडा (ता. हिंगणा) येथे राहणारे सुलभ कल्लूचंद जैन (26) हे टीसीएस कंपनीत अभियंता म्हणून कामाला आहेत. सुलभ यांना ऍक्‍टिव्हा जुनी दुचाकी खरेदी करायची होती. 31 मे रोजी सुलभने ओएलएक्‍स ऍपवर एक जाहिरात पाहिली. जाहिरातीतील दुचाकी त्यांना आवडली. त्यानंतर सुलभने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून विकास पटेल या आरोपीशी बोलणी केली. 35 हजारांत दुचाकी खरेदी करण्याचा सौदा झाला. सुलभ यांचा विश्‍वास बसावा म्हणून आरोपीने त्याचे आधार कार्ड आणि आर्मी ऑफिस कॅन्टीनचे कार्ड पाठविले. सुलभची खात्री पटताच त्यांनी गुगल पे खात्यामार्फत 35 हजार 340 रुपयांचा भरणा केला. त्यानंतर सुलभने आरोपीसोबत संपर्क केला असता त्याने फोन उचलला नाही आणि दुचाकीदेखील दिली नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच सुलभने हिंगणा पोलिसांत तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी 420, सहकलम 66(सी) (डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com