सिमेंट बंधारा प्रकरणी अभियंते, कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

कोरची (गडचिरोली) : तालुक्‍यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हुडुकदुमा येथे चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा वाहून गेल्याप्रकरणी जल व मृद संधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती दिली. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने त्यांनी त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला.

कोरची (गडचिरोली) : तालुक्‍यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हुडुकदुमा येथे चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा वाहून गेल्याप्रकरणी जल व मृद संधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती दिली. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने त्यांनी त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. त्यातूनच गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जलयुक्‍त शिवार योजनेची कामे करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून बोरी ग्रामपंचायतीअंतर्गत हुडुकदुमा येथे 10 टीसीएम क्षमतेचा एक बंधारा जंगलातून येणाऱ्या नाल्यावर लक्षावधींचा खर्च करून बांधण्यात आला. कोरची तालुक्‍यात पडयालजोब येथे तीन बंधारे, घुगवा येथे दोन, हेटाळकसा पाच, हुडुकदुमा दोन, खसोडाला दोन, काडे दोन असे 16 बंधारे मंजूर करण्यात आले. सोळाही बंधाऱ्यांच्या कामावर कनिष्ठ अभियंता किंवा उपविभागीय अभियंता यांनी कधी भेट दिली नाही. परिणामी कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineer, contractor sued in cement bandhara case