अभियांत्रिकीची घरघर संपणार!

मंगेश गोमासे
सोमवार, 4 जून 2018

नागपूर - राज्यात एमएचटी-सीईटीचा निकाल शनिवारी (ता.२) घोषित करण्यात आला. निकालात २ लाख ९० हजार ६१८ विद्यार्थी ‘पीसीएम’ गटात उत्तीर्ण झाले. राज्यातील शासकीय आणि खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागेच्या तुलनेत ही संख्या मोठी असल्याने यंदा अभियांत्रिकी शाखेतील रिक्त जागांची घरघर संपणार आहे. 

नागपूर - राज्यात एमएचटी-सीईटीचा निकाल शनिवारी (ता.२) घोषित करण्यात आला. निकालात २ लाख ९० हजार ६१८ विद्यार्थी ‘पीसीएम’ गटात उत्तीर्ण झाले. राज्यातील शासकीय आणि खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागेच्या तुलनेत ही संख्या मोठी असल्याने यंदा अभियांत्रिकी शाखेतील रिक्त जागांची घरघर संपणार आहे. 

बारावीचा निकालानंतर एमएचटी-सीईटीचा निकालाची घोषणा करण्यात आली. गतवर्षी राज्यातील ३६० महाविद्यालयांमधील एक लाख ४४ हजार ८८१ जागांसाठी सव्वा दोन लाखांवर अर्ज आले. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा तसा कमी राहील, अशी आशा महाविद्यालयांना होती. गतवर्षी तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील १३ हजार २१८ अल्पसंख्याक तर एक लाख १३ हजार ३४६ सामान्य विद्यार्थी असे एक लाख २६ हजार ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश ‘कॅप राउंड’च्या माध्यमातून देण्यात येणार होते. मात्र, त्यापैकी ७ हजार ५५८ अल्पसंख्यांक, ५८ हजार ४८० सामान्य विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले. संपूर्ण शिक्षण शुल्क असलेल्या ४ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविले. तसेच महाविद्यालयात पातळीवरील थेट प्रवेश प्रक्रियेत राज्यातून पाच हजारावर प्रवेश देण्यात आल्याने एकूण जागांपैकी ७१ हजारांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

 राज्यात सीईटीसाठी जवळपास चार लाखांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २ लाख ९० हजार ६१८ विद्यार्थी पीसीएममध्ये उत्तीर्ण झाले. सध्या राज्यात ३२६ महाविद्यालयात १ लाख २९ हजार जागा आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी निम्मे विद्यार्थी राहिल्यास अभियांत्रिकी रिक्त जागांची घरघर संपणार असल्याचे चित्र आहे.

विभागातही संख्या घटणार 
नागपूर विभागातील गतवर्षी ५६ महाविद्यालयात २२ हजार २६६ जागांचा समावेश होता. या जागांसाठी अठरा हजारांवर अर्ज आले. त्यामुळे यावर्षी रिक्त जागांची संख्या घटेल असे चित्र होते. मात्र, विभागात निम्म्या जागा रिक्त होत्या. यंदा जवळपास ती संख्या घटणार असल्याचे चित्र राहण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे जवळपास पाच महाविद्यालयांनी प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला. 

पीसीएमचे गुण         विद्यार्थी संख्या 
२०० ते १७६                      २५७  
१७५  ते १५१                   २,३८२ 
१५१ ते १२६                    ६,१०८ 
१२६ ते १०१                  १३,३२६ 
१०० ते ५१                    २,११,६२३ 
५० ते त्यापेक्षा कमी         ६२,९२२ 
एकूण                        २, ९०, ६१८

Web Title: engineering issue solve