अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना "इंटर्नशिप' आवश्‍यक 

मंगेश गोमासे
गुरुवार, 23 मार्च 2017

नागपूर - अभियांत्रिकी अभ्यासक्रम केल्यावर नोकरी मिळत नाही, असा सूर आहे. कंपन्याही विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य नसल्याची तक्रार करतात. यावर उपाय म्हणून आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष उद्योगांमध्ये अभ्यासक्रमांसोबतच किमान 50 टक्के "इंटर्नशिप' आवश्‍यक करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयांनी या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता काढण्यात येईल. 

देशात दरवर्षी लाखोंच्या संख्येने अभियंते तयार होतात. मात्र, त्या अभियंत्यांमधून बऱ्याच कमी विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळते. उद्योगांकडूनही 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी अभियंत्यांत हवे असलेले "स्कील' असल्याची टीका केली जाते. त्यामुळे गत दोन वर्षांपासून स्किल बेसड्‌' अभ्यासक्रम तयार करण्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने भर दिला आहे. असे अभ्यासक्रम तयार करीत असतानाही प्रत्यक्षात कंपन्यांमध्ये कशा प्रकारचे काम केले जाते, याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे देशातील पाच टक्के महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या "इंटर्नशिप' कार्यक्रम योग्यरीत्या राबवीत नसल्याचे दिसते. त्यामुळेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) यापुढे अभ्यासक्रमासोबत उद्योग कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के "इंटर्नशिप' करण्याची सक्ती केली आहे. यापूर्वी ही इंटर्नशिप केल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी न देण्याचा विचार परिषदेचा होता. मात्र, आता त्यात बदल करून पदवी न देण्यापेक्षा महाविद्यालयावरच कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वीच कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यानुसार, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी किमान 50 टक्के "इंटर्नशिप' करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाला याबद्दल माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने कौन्सिलचा निर्णय आहे. 

-डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) 

महाविद्यालयात "इंटर्नशिप'ची योजना राबविणे अतिशय चांगला निर्णय आहे. मात्र, विद्यापीठाने अभ्यासक्रमासोबत परीक्षेची सूट दिल्यास हा निर्णय योग्यरीत्या अंमलात आणता येईल. 
-डॉ. प्रशांत कडू, प्राचार्य, एनआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय. 

Web Title: Engineering students internship