अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी साकारली "गो कार्ट' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नागपूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कल्पकता आणि जिद्दीच्या बळावर अत्यंत कमी किमतीत "गो कार्ट' (रेसिंग कार) साकारली आहे. जालंधर येथे आयोजित इंटरनॅशनल गो कार्ट चॅम्पियनशिपमध्ये हे वाहन सहभागी होणार आहे. कमीत-कमी किमतीत गो कार्ट साकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे पथक मंगळवारी छत्तीसगड एक्‍स्प्रेसने स्पर्धास्थळी रवाना झाले. 

वेगात वाहन चालविण्याचा थरार अनुभविण्यासाठी कार रेसिंग हा पर्याय आहे. जागतिक स्तरावर फॉर्म्युला वन वाहने स्पर्धक चालवितात. त्याचेच छोटे "वर्शन' म्हणजे "गो कार्ट'. गो कार्टचा थरारक अनुभव सामान्यांसाठी खिशाला न परवडणारा आहे. पण, यवतमाळच्या जगदंबा इंजिनिअरिंगच्या 18 विद्यार्थ्यांच्या पथकाने केवळ दीड लाखात गो कार्ट साकारली. यासाठी त्यांनी दुचाकीचे इंजिन वापरले असून, चेसीस आणि आकार स्वत:च डिझाइन केले आहे. शक्‍य तितक्‍या कमी खर्चात वेगवेगळे पार्ट जोडून तयार करण्यात आलेले हे वाहन जालंधर येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे आयोजित गो कार्ट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी करण्यात येणार आहे. पेट्रोलवर चालणारे हे वाहन अधिकाधिक ताशी 80 किमी वेगाने धावू शकते. वेग आणखीही वाढविता येऊ शकतो. पण, स्पर्धेच्या नियमानुसार वेग, डिझाइन, इंधन, ग्राउंड क्‍लियरन्स ठेवण्यात आले आहे. वाहन तयार करणारे विद्यार्थ्यांचे पथक वाहन घेऊन मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर आले. छत्तीसगड एक्‍स्प्रेसने सर्व जण जालंधरकडे रवाना झाले. नियंत्रण, चाल, डिझाईन, गती या सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेवून वाहनाचा आविष्कार करण्यात आल्याने स्पर्धेतील अनेक पुरस्कार निश्‍चितच आपल्या पदरात पडतील, असा विश्‍वास पथकाचे प्रमुख अनुज संगावर, कल्पक बाहेकर यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. 

Web Title: Engineering students played Go Kart