अभियंत्यांचे काळ्या फिती लावून काम

नागपूर : अभियंत्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी.
नागपूर : अभियंत्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी.

नागपूर  : खेड आणि कणकवली येथील अभियंत्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करीत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम केले. दोषींवर कायदेशीर कारवाईच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाम विभागाचे राज्यमंत्री डॉ. परिणय फुके व जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांना दिले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड व कणकवली येथे शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अभियंत्यांना काही लोकप्रतिनिधींनी अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना शारीरिक इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पहिल्या घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जगबुडी नदीवरील पुलावर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता बामणे व उपअभियंता गायकवाड यांना पुलाच्या रेलिंगला बांधून शारीरिक इजा पोहोचविण्याचे कार्य तेथील काही लोकप्रतिनिधींनी केले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवलीजवळ उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल टाकून त्यांचा अवमान करण्याचा व शारीरिक इजा पोहोचविण्याचा प्रकार काही लोकप्रतिनिधींनी केला. विभागातील अभियंत्यांनी एकत्र येत सभा घेऊन घटनांचा निषेध केला. दोषींवर कारवाई न झाल्यास असहकार आंदोलन पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, अजय पोहेकर, अनिल येरकडे, मिलिंद बांधवकर, चंद्रशेखर गिरी, अंभोरे, जैसवाल, बलवंत रामटेके, राऊत, ढगे, लभाने, अविनाश गुल्हाने, भोगे तसेच कनिष्ठ अभियंता संघटना, राजपत्रित अभियंता संघटना, सरळसेवा अभियंता अधिकारी संघटना, महानगरपालिका अभियांत्रिकी संघटना व सर्व अभियांत्रिकी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
कास्ट्राईब कर्मचारी संघटनेकडून निषेध
मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली येथे रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता प्रकाश खेडेकर यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी आमदार नितेश राणे व त्यांच्या समर्थकांनी केलेल्या अमानवीय व्यवहाराचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने निषेध केला. मारहाण करणारे व त्यांच्या समर्थकांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी महासंघाचे कृष्णा इंगळे, नरेश मेश्राम, जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे, नरेंद्र धनविजय, राजकुमार रंगारी, प्रेमदास बागडे, जालंधर गजभारे, जगन्नाथ सोरते, विनोद गजभिये, अजय वानखेडे, बबन ढाबरे, दिलीप चौरे, राकेश कांबळे, निकोसे, अरविंद गणवीर, अशोक राऊत, निरंजन पाटील आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com