लग्नसमारंभात फळरोपे वितरित करून पर्यावरणाचा संदेश

मुशीरखान कोटकर
गुरुवार, 18 मे 2017

देऊळगांव राजा (जि. बुलढाणा) : लग्न समारंभात रूढ झालेल्या काही खर्चिक बाबी असतानाही येथील जायभाये कुटुंबियांनी लग्नसभारंभाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांना फळरोपे भेट देऊन पर्यावरणाचा संदेश देत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

देऊळगांव राजा (जि. बुलढाणा) : लग्न समारंभात रूढ झालेल्या काही खर्चिक बाबी असतानाही येथील जायभाये कुटुंबियांनी लग्नसभारंभाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांना फळरोपे भेट देऊन पर्यावरणाचा संदेश देत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

अलिकडे लग्नसमारंभात हार-तुरे, भाषणे अन रटाळ वाटणारा लांबलचक स्वागत समारंभ पहायला मिळतो. किनगावराजा येथील डॉ. शिवानंद जायभाये यांचे बंधू भरत यांचा लग्नसमारंभ देऊळगांव राजा येथील दिनदयाल विद्यालयात आयोजित करण्यात आल होता. जायभाये व मुंढे या प्रतिष्ठित घराण्यातील लग्नात ही अनिष्ट प्रथांची प्रचिती उपस्थितांना अपेक्षित असतांना निवेदकाने एका महत्वाच्या सूचनेकडे लक्ष वेधले. "या शुभमंगल सोहळ्यात 551 फळ रोपे भेट स्वरुपात वितरित करण्यात येणार असून पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने फळरोपे भेट म्हणून मिळालेल्या सर्वांनी वृक्षलागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन करावे, ही कळकळीची विनंती', अशी सूचना निवेदकाने केली. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जायभाये कुटुंबियांनी प्राथमिक स्वरुपात चिक्कूची 50 फळरोपे वितरित केली. उर्वरित फळरोपोंचे स्व. लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त येत्या 3 ते 21 जून दरम्यान साजऱ्या करण्यात येणाऱ्या पर्यावरण सप्ताहादरम्यान सावखेड ते सावखेड फाट्यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शिवानंद जायभाये यांनी दिली. या अनोख्या उपक्रमाबद्दल दोन्ही कुटुंबियांचे लग्नसोहळ्यातील उपस्थितांनी कौतुक केले.

Web Title: Environment message by distributing fruit plants