ईपीएस 95 कर्मचार्‍यांनी केले मुंडन आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

बुलडाणा : ईपीएस-95 अंतर्गत येणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी मंगळवारी (ता.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन केले. यावेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्राधिकरणाचा मृत्यू झाल्याचा शोक मनवत पिंडदान केले. तसेच जोरदार घोषणाबाजी करीत ईपीएफओच्या मृत्यूचा शोक देखील केला. 
ईपीएस-95 कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. 

जिल्हाभरातून आलेले शेकडो निवृत्त कर्मचारी जयस्तंभ चौकातील गांधी भवनात एकत्रित झाले होते. त्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात सर्व निवृत्त कर्मचारी घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा वळविला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करीत निवृत्त कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी करणाकडून ईपीएस-95 कर्मचार्‍यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी जमललेल्या निवृत्त कर्मचार्‍यांनी हातात ईपीएफओ मर गया, अशा आशयाचे फलक घेतले होते.

ईपीएफओ मृत्युमुखी पडला असल्याचा आरोप करीत निवृत्त कर्मचार्‍यांनी या वेळी स्वत:चे मुंडन करवून घेतले. तसेच पिंडदान करीत ईपीएफओचे तेरावे साजरे केले. या वेळी प्रतीकात्मक स्वरूपात ईपीएफोच्या मृत्यूचा शोकदेखील करण्यात आला. आंदोलनात निवृत्त महिला कर्मचार्‍यांची देखील मोठी संख्या होती. आंदोलनासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

ईपीएफओ मृतवत झाल्याने आज आम्ही त्याचे तेरावे करीत मुंडन केले. यापुढे ईपीएफओच्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात येणार असून, जोपर्यंत ईपीएस-95 कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.
- कंमाडर अशोक राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष, ईपीएस 95

Web Title: EPS 95 employees protest have cut them hair