मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; महिलेसह दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

खामगाव(बुलढाणा) : मालवाहू वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने महिलेसह दोन जण ठार झाल्याची घटना आज (ता .८) दुपारी एक वाजेच्या सुमारास खामगाव-बुलढाणा मार्गावर शिरसगाव फाट्याजवळ घडली.

खामगाव(बुलढाणा) : मालवाहू वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने महिलेसह दोन जण ठार झाल्याची घटना आज (ता .८) दुपारी एक वाजेच्या सुमारास खामगाव-बुलढाणा मार्गावर शिरसगाव फाट्याजवळ घडली.

अक्षय वसंतराव देशमुख (वय २३), सौ. कांताबाई रामराव देशमुख( वय ६०) अशी मृतकांची नावे असून ते बुलढाणा येथील रहिवाशी आहेत. बुलढाणा येथून अक्षय देशमुख हा त्याची मावशी कांताबाई यांच्या सोबत दुचाकीने (क्रमांक एम. एच. २८ ए. एच. ७६३५) खामगाव जवळच्या वाडी येथे येत होता. दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या 'टाटा ४०४' या मालवाहू वाहनाने (क्रमांक एम. एच. २८ ए. बी.६५५) दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण व त्याची मावशी जागीच ठार झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

Web Title: esakal marathi news buldhana accident news