महाबीज संचालकपदाच्या निवडणुकीचा निकाल २० जानेवारीला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळावर दोन संचालक पदासाठी होऊ घातलेल्या निवडणूकीतील मतदानाचा टप्पा शनिवारी (ता.१३) अटोपला. आता उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा असून, २० जानेवारी रोजी विजेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळावर दोन संचालक पदासाठी होऊ घातलेल्या निवडणूकीतील मतदानाचा टप्पा शनिवारी (ता.१३) अटोपला. आता उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा असून, २० जानेवारी रोजी विजेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

महाबीजच्या कृषक भागधारकांनी संचालक मंडळावर दोन संचालक निवडून द्यावयाचे असतात. त्याकरिता २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ७ डिसेंबरपर्यंत अकोला व उर्वरित मतदार संघातून सहा नामांकन अर्ज महाबीजकडे प्राप्त झाले होते. निवडणूक कार्यक्रमानुसार २३ डिसेंबर ते १३ जानेवारीपर्यंत अकोला (विदर्भ विभाग) मतदार संघ व उर्वरित महाराष्ट्र मतदार संघातून भागधारकांना मतदानाचा हक्क बजावता येणार होता. परंतु, १४ डिसेंबरपूर्वी उर्वरित महाराष्ट्र संघातून तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने, बुलडाणा जिल्ह्यातील वल्लभराव तेजराव देशमुख यांची निवड निश्चित झाली होती. त्यामुळे केवळ एक पदासाठी अकोल्याचे संजय धोत्रे व प्रशांत गावंडे यांच्यात लढत होती. त्याकरिता १३ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष तसेच टपाल मतपत्रिकेने मतदान करण्यात आले. मतदानासाठी आज शेवटचा दिवस उरला असून, २० जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

नऊ जिल्ह्यातील भागधारकांची मते पेटीबंद
उर्वरित महाराष्ट्र मतदार संघातून वल्लभराव तेजराव देशमुख यांची अविरोध निवड झाली होती. त्यामुळे केवळ अकोला (विदर्भ विभाग) मतदार संघातील संचालक पदासाठीच्या उमेदवाराची निवड अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, बुलडाणा (खामगाव, नांदुरा) जिल्ह्यांतील २२ हजार ४११ भाग असेलेल्या तीन हजार ४६५ भागधारकांच्या मतांवर अवलंबून होती. टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान झाले अाहे.

Web Title: esakal marathi news Maharashtra State Seeds Corporation Limited election