व्यापाऱ्याच्या घरी दरोडा ; महिलेस शस्त्राचा धाक दाखवून लाख रुपये लुटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

यवतमाळ शहरातील व्यापारी विजय अडतीया हे कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांची पत्नी ममता अडतिया या घरी एकट्या होत्या. त्यावेळी तोंडाला काळा कापड बांधून  आलेल्या दोन दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून ममता अडतिया यांना घरात असलेल्या पाळीव कुत्र्याला घरातील एका रूम मध्ये सोडायला सांगितले.

यवतमाळ : शहरातील उच्चभ्रू अग्रवाल ले आऊट मध्ये व्यापारी विजय अडतीया यांच्या घरी दोन दरोडेखोरांनी घरातील एकट्या महिलेस शस्त्राचा धाक दाखवून घरातून लाखो रुपये केले लंपास केले आहे.

यवतमाळ शहरातील व्यापारी विजय अडतीया हे कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांची पत्नी ममता अडतिया या घरी एकट्या होत्या. त्यावेळी तोंडाला काळा कापड बांधून  आलेल्या दोन दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून ममता अडतिया यांना घरात असलेल्या पाळीव कुत्र्याला घरातील एका रूम मध्ये सोडायला सांगितले. त्यांचा मोबाईल हिसकावून सलवारच्या ओढणीने त्यांचे तोंड दाबून घरातील अलमारी मधील लाखो रुपये घेऊन मागील दारातून पसार झाले .

ही घटना सायंकाळी 8 च्या सुमारास घडली  घरी महिला एकटी असल्याचे पाहून दोन दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून घरातून लाखो रुपये केले लंपास केल्यामुळे पोलिसांचा वचप कमी झाला काय असा प्रश्न निर्माण झाला आहे .

Web Title: esakal news yavatmal news

टॅग्स