पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर : शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक व मुख्याध्यापक कष्ट घेत आहेत. याकडे दुर्लक्ष करून अन्न आणि औषध प्रशासन विभाग शिक्षकांवर कारवाईची तलवार रोखत आहे. या योजनेची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांना देऊ नका. यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष तुषार अंजनकर यांनी केली आहे.

मुलांचे पोषण झाले नाही, तर शिक्षण कसे होणार, या उदात्त हेतूने शिक्षकांनी योजनेची जबाबदारी स्वीकारली. शिक्षकांच्या योगदानामुळे योजना राबवणे शक्‍य झाले. परिणामी पटनोंदणी आणि उपस्थिती वाढल्याचे दिसून येत आहे. योजनेचा हिशेब ठेवण्यापासून आहार शिजवण्यावर देखरेख करण्याच्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक व मुख्याध्यापक मेटाकुटीला आले आहेत. त्यांचा शिकवण्याचा वेळ वाया जात आहे. याकडे डोळेझाक केली जाते, असे शिक्षक सेनेचे विदर्भ सरचिटणीस टीकाराम कडुकर यांनी सांगितले. दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासन शिक्षक व मुख्याध्यापकांना नोटीस बजावत असल्याचे समोर आले आहे. यात पाच लाख रुपये दंड किंवा सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establish a separate mechanism for nutrition aahar