भटक्‍यांच्या उपक्रमासाठी अभ्यास समितीचे गठण

file photo
file photo

नागपूर : विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सारथी या संस्थेच्या धर्तीवर एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी, सर्वंकष अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. समाजकल्याण मंत्र्यांसह आठ जणांची ही समिती असून, समितीला 30 दिवसांच्या आत अभ्यास करून सरकारला अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात 23 लाखांपेक्षा अधिक युवक विमुक्त भटक्‍या समाजात आहेत. या समाजाच्या विकासाचे धोरण तयार करताना शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी, अशी मागणी वसंतराव नाईक प्रसार-प्रचार समितीने केल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रकाशित केले होते. यासाठी पाठपुरावादेखील केला होता. त्याची दखल शासनाने घेतली. त्यानुसार विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीला तज्ज्ञ व्यक्तीला समावेश करण्याचा अधिकार दिला आहे. समितीसाठी कार्यकक्षाही निर्धारित केल्या आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था या दोन्ही संस्था स्थापन करण्यासाठी उद्दिष्टे, संस्थेची नोंदणी, संस्थेचे मेमोरॅंडम ऑफ असोसिएशन तसेच आर्टिकल ऑफ असोसिएशन या बाबींचा अभ्यास करावा. सारथीच्या धर्तीवर विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी स्थापना करावयाच्या स्वायत्त संस्थेची संरचना कशी राहील, याचाही अहवाल सादर करायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com