एटापल्ली तालुक्याला मिळाली शववाहिका

एटापल्ली तालुक्याला मिळाली शववाहिका

एटापल्ली (गडचिरोली)- तालुक्यात वाहतूक विरहित 198 गांव खेड़ी असून शव-वाहिका शिवाय नागरिकांना मृत नातेवाहिकांचा मृतदेह रुग्णालयातुन स्वगावी घेऊन जाण्यास फार मोठी अड़चन निर्माण होत असल्याने पंचायत समिति सदस्य जनार्धन नल्लावार यांच्या मागणीवरून आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्हा पालक मंत्री राजे राजे अंबरीशराव आत्राम यांच्या आमदार विकास निधीच्या खर्चातुन शववाहिका खरेदी करण्यात आली आहे.

तालुक्यात शववाहिका नसल्याने अनेक नागरिकांच्या मृत नातेवाहिकांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयातुन स्वगावी अंत्यविधी करीता घेऊन जाण्यास अडचणी निर्माण होत असल्याने अशा वेळी पर्यायी खाटेवरून, बैलबंडीतुन इतकेच नाही तर दिनांक 13 जानेवारी 2016 रोजी संदीप तोंदे पोटामी या दहा वर्षाच्या मूकबधिर आईवडिलांना एकुलता एक बालकाचा मृतदेह त्याचे पालक तोंदे पोटामी यांनी रात्रीच्या अंधारातुन एटापल्ली वरून तुमरगुंडा या गावी पाच किलोमीटर पायी चालत चक्क खांद्यावर वाहून नेल्याची बातमी दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित झाल्या नंतर हे प्रकरण अख्या महाराष्ट्रात गाजले होते.

शासन व प्रशासन खळबळू जागे होऊन प्रकारणाची उच्च स्तरीय चौकशी करून यात रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरविंद अकिनवार व वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश सेलोकर यांना जबाबदार धरून निलंबित करण्यात आले होते, या घटनेनंतर सतत तीन वर्षापासून विविध पक्ष संघटनांकडून सेववाहिका देण्याची मागणी शासन स्तरावर केली जात होती, नागरिकांचे मागणीची दखल घेऊन ना. राजे राजे अंबरीशराव आत्राम यांनी तालुक्याला शववाहिका उपलब्ध करून दिली आहे. सदर शववाहिकेस संदीप तोंदे पोटामी याचे स्मृती नाव द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com