युरोपियन युनियन, एएफडी देणार 8 कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

युरोपियन युनियन, एएफडी देणार 8 कोटी
नागपूर : शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यास आराखडा तयार करण्यासाठी युरोपियन युनियन 1 मिलियन युरो अर्थात 8 कोटी रुपये महापालिकेला देणार आहे. फ्रान्सची एएफडी एजन्सी तांत्रिक सहकार्य करणार असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सांगितले.

युरोपियन युनियन, एएफडी देणार 8 कोटी
नागपूर : शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यास आराखडा तयार करण्यासाठी युरोपियन युनियन 1 मिलियन युरो अर्थात 8 कोटी रुपये महापालिकेला देणार आहे. फ्रान्सची एएफडी एजन्सी तांत्रिक सहकार्य करणार असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सांगितले.
महानगरपालिका, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) व युरोपियन युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "शाश्वत शहरी गतीशीलतेला प्रोत्साहन' या विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाच्या सत्रानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी एएफडीचे लिड ट्रान्सपोर्ट स्पेशॅलिस्ट अर्नाड डॉफीन, भारतातील युरोपियन युनियन प्रतिनिधी वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक स्मिता सिंग आदी उपस्थित होते. मोबिलाईज युवर सिटी उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी देशातील कोची, अहमदाबाद व नागपूर शहराची निवड करण्यात आली. नागपुरातही हा उपक्रम राबविला जाणार असून, आज शहरातील वाहतूक समस्या व त्यावरील उपायासंबंधी कार्यशाळेत चर्चा झाल्याचे ते म्हणाले. पुढील तीन वर्षांत हा उपक्रम राबविण्यात येईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात येईल, असे डॉ. सोनवणे म्हणाले. उद्या कार्यशाळेचा दुसरा दिवस असून यात एकात्मिक वाहतूक आराखड्यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. पहिल्या दिवशी कार्यशाळेत महामेट्रो, नीरी, नासुप्रसह 16 संस्थांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.
महापौरांनी केले उद्‌घाटन
दोनदिवसीय कार्यशाळेचे उद्‌घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंग उपस्थित होते. शहर स्मार्ट शहरांच्या यादीत आल्यापासून शहरातील विकासकामांना गती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुढाकारामुळे एएफडी व युरोपियन युनियनसारख्या संघटनांनी मदतीचा हात दिल्याचे महापौर म्हणाल्या.
आयुक्त म्हणाले, जनजागृतीची गरज
महामेट्रोमुळे वाहतुकीची समस्या सुटणार आहे. मात्र, सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंग म्हणाले. लोकांची मानसिकता बदलल्याशिवाय कोणत्याही विकासाला मूर्तरूप येत नाही. बिलाईज युवर सिटी उपक्रमांतर्गत एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट व युरोपियन युनियनतर्फे महानगरपालिकेला तांत्रिक सहकार्य मिळणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: European Union, AFD will give 8 crores