इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

यवतमाळ - यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ६० मतदारसंघांसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने उमरखेड तालुक्‍यातील विडूळ मतदारसंघात निवडणूक होणार नाही. या सर्व मतदारसंघात राजकीय पक्षांकडून इच्छुक  उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेच्या मुलाखती आटोपल्या आहेत, तर काँग्रेसच्या मुलाखती १७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची मुलाखतीची तयारी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी खासगी एजन्सीला सर्वेक्षणाचे काम दिले आहे. त्या एजन्सीकडून आलेल्या अहवालानुसारच उमेदवार निवडण्यात येणार आहे.

या वेळी जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे सर्वच पक्षांनी जाहीर केले आहे. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेची निवडणूक युती न करता लढणार असल्याचे जिल्हा शिवसेनेने स्पष्ट केले. तसेच त्यांनी उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या. मध्यरात्रीपर्यंत या मुलाखती चालल्या. शिवसेनेकडे अनेकांनी उमेदवारी मागितली. जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये व विधान परिषदेत शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्यामुळे शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या यावेळी वाढली आहे. 

पालकमंत्री बदलावरून शिवसेना व भाजपमध्येच जुंपल्याने शिवसेनेने भाजपसोबत युती न करता स्बबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. हीच स्थिती कमी-जास्त दोन्ही काँग्रेसची आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल, याबाबत शंका आहे. दोन्ही पक्ष स्वबळावरच लढण्याच्या तयारीत आहेत. तर, या दोन्ही पक्षातील काही दिग्गज नेते भाजप किंवा सेनेच्या वाटेवर आहेत. मात्र, आघाडीच्या निर्णयाबाबत ‘पहले तुम, पहले तुम’ असे सुरू आहे. आम्ही तयार आहोत, त्यांनी पुढाकार घ्यावा, असे वक्तव्य नेते देत आहेत. मात्र, आघाडीतील नेत्यांचे संबंध बघता आघाडी होईल हे कदापि शक्‍य वाटत नाही. सत्तेच्या लालसेपोटी सर्वच पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यासाठी प्रमुख काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखतीचे सत्र सुरू केले आहे. तर, बहुजन समाज पक्ष, एमआयएम, संभाजी बिग्रेड आदींसह छोट्यामोठ्या आघाड्यांचीही तयारी सुरू झाली. उमेदवारांची निवडणूक मेरिटनुसार केली जाणार आहे. येत्या आठ दिवसांत याबाबतच चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Evaluation of candidates wishing to start