ईव्हीएम बंदचा फटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

भंडारा : विधानसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भाग्य मतदारांनी आज, सोमवारी मशीनमध्ये बंद केले. दरम्यान काही ठिकाणी ईव्हीएम व व्हीव्हीपॅड मशीन बंद झाल्याने मतदानात व्यत्यय आला. मात्र, मशीन बदलविल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. दुपारनंतर झालेल्या रिमझिम पावसामुळे मतदानाचे प्रमाण कमी झाले. 

भंडारा : विधानसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भाग्य मतदारांनी आज, सोमवारी मशीनमध्ये बंद केले. दरम्यान काही ठिकाणी ईव्हीएम व व्हीव्हीपॅड मशीन बंद झाल्याने मतदानात व्यत्यय आला. मात्र, मशीन बदलविल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. दुपारनंतर झालेल्या रिमझिम पावसामुळे मतदानाचे प्रमाण कमी झाले. 
जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली मतदारसंघातील 1206 मतदान केंद्रात सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला नऊ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 3.89 होती. सकाळी 10 वाजेपासून मतदानासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात 18.91 टक्के मतदान झाले. यात तुमसर 19.30, भंडारा 17.20 आणि साकोली मतदारसंघात 20.55 टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली.
दुपारी एक वाजेपर्यंत 31.45 टक्के मतदान झाले तर, तीन वाजेपर्यंत 50.56 टक्के मतदान झाले. मतदान केंद्रात आलेल्या काही मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना परत जावे लागले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 64.01 टक्के मतदान झाले. तुमसर येथे 66.20 टक्के, भंडारा येथे 59.53 टक्के आणि साकोली मतदारसंघात 67.13 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरूच होते. 

मशीन बंदमुळे गोंधळ
सकाळी सात वाजता मतदान सुरू होताच जिल्ह्यातील काही केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅड मशीनमध्ये बिघाड आला. यामुळे काही काळ मतदानप्रक्रिया ठप्प झाल्याने गोंधळ उडाला होता. लाखनी तालुक्‍यात धाबेटेकडी, रेंगेपार (कोहळी), इसापूर, केसलवाडा (पवार), मुरमाडी (सावरी), लाखनी, रेंगेपार (कोठा) व गोंडसावरी येथील केंद्रातील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आला होता. तसेच पळसगाव व किडाळी येथील केंद्रात व्हीव्हीपॅड मशीनमध्ये बिघाड आला. लगेच प्रशासनाने बिघाड आलेल्या मशीनच्या जागी राखीव मशीन लावल्याने मतदान सुरळीत सुरू झाले.दुपारनंतर आलेसूर व सोमलवाडा येथील मशीनमध्ये बिघाड आला. याशिवाय तुमसर मतदार संघातील सितेपार, बघेडा व मोहगाव (खदान) येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आला होता. पवनी तालुक्‍यातील वाही केंद्रातील मशीन बंद पडले होते. लाखांदूर तालुक्‍यात मुरमाडी, साखरा व बोथली येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याने सुमारे तासभर मतदान रखडले होते. त्यामुळे मतदान केंद्रात महिला पुरुषांना प्रतीक्षा करावी लागली. 

पावसाचा फटका
मतदानासाठी मतदारांची गर्दी वाढत असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास करडी, पालोरा व जांभोरा या भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मतदानास येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर मोहाडी, वरठी, भंडारा येथील काही भागात पाऊस झाला. त्यामुळे मतदारांची धावपळ झाली. काही मतदार छत्री घेऊन मतदानासाठी आले. त्यामुळे सायंकाळी मतदान केंद्रावर गर्दी वाढली होती. 

दिव्यांग मतदारांत उत्साह
विधानसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना कोणतीही असुविधा होऊ नये याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली. यात मतदानकेंद्रावर रॅम, व्हीलचेअर, दिव्यांग मित्रांची व्यवस्था करण्यात आली. या मतदारांची ने-आण करण्यासाठी लागणारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EVM Shut Off