माजी आमदार संजय बंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

अमरावती : माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 14) येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमरावती : माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 14) येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरुवारी (ता. 13) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने बंड यांचे निधन झाले. शुक्रवारी (ता. 14) शहरातील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लोकप्रिय नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अमरावतीकरांनी त्यांच्या श्रीविकास कॉलनीतील निवासस्थानी प्रचंड गर्दी केली होती. दुपारी ठीक तीन वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. 16 चाकी मोठ्या ट्रेलरवर संजय बंड यांचे पार्थिव ठेवण्यात आले. सायंकाळी पाच वाजता त्यांचे पार्थिव हिंदू स्मशानभूमी येथे पोहोचले. जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी हिंदू स्मशानभूमीचा परिसर तुडुंब भरला होता. अशी अभूतपूर्व गर्दी पहिल्यांदाच अमरावतीकरांनी अनुभवली. त्यांचे पुत्र स्वराज बंड यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अमरावती जिल्ह्यातील एक लोकप्रिय नेत्याच्या निघून जाण्याने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  

 

 

Web Title: Ex-MLA Sanjay Band's funeral