माजी सैनिकाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) ः भारतीय सैन्यदलाचा राजीनामा देऊन वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी स्वगावी परतलेल्या माजी सैनिकाचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना 22 जूनला रात्री साडेनऊच्या सुमारास उटी गावाजवळ घडली. प्रमोद कुडावले असे मृताचे नाव आहे. तो सावली तालुक्‍यातील किसाननगरातील रहिवासी आहे. किसाननगर येथील प्रमोद कुडावले यांनी भारतीय सैन्य दलात दहा वर्षे सेवा दिली. कारगिल युद्धाच्यादरम्यान ते जम्मू-काश्‍मीर सीमेवर होते. मात्र, वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी त्यांनी सैन्यदलाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते किसाननगर येथे वास्तव्यास होते.

व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) ः भारतीय सैन्यदलाचा राजीनामा देऊन वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी स्वगावी परतलेल्या माजी सैनिकाचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना 22 जूनला रात्री साडेनऊच्या सुमारास उटी गावाजवळ घडली. प्रमोद कुडावले असे मृताचे नाव आहे. तो सावली तालुक्‍यातील किसाननगरातील रहिवासी आहे. किसाननगर येथील प्रमोद कुडावले यांनी भारतीय सैन्य दलात दहा वर्षे सेवा दिली. कारगिल युद्धाच्यादरम्यान ते जम्मू-काश्‍मीर सीमेवर होते. मात्र, वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी त्यांनी सैन्यदलाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते किसाननगर येथे वास्तव्यास होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गडचिरोली येथील मल्लेवार कंपनीमध्ये ट्रकचालक म्हणून काम करू लागले. शनिवारी रात्री गडचिरोली येथून गिट्टी घेऊन ते नागपूरकडे जात होते. उटी गावाजवळ दोन ट्रकमध्ये अपघात झाला. यात प्रमोद कुडावले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. घरचा कर्ता गेल्यामुळे कुडावले कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्या पश्‍चात आईवडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्तरिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-serviceman's accidental death