निकाल एकमेव टप्पा नाही, संधी दार ठोठावतेय!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

यश हे गुणांवर नाही, तर गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे निकालाच्या गुणांवर निराश हाेऊ नका. पालकांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. पालकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य आेळखून त्या दिशेने त्याला दिशा द्यावी.
- डॉ. अनुपकुमार राठी, मनाेविकार तज्ज्ञ, अकाेला

अकोला : निकाल हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरी, हा एकमेव टप्पा नाही. आयुष्यात अशा अनेक संधी दार ठोठावणार आहेत. त्यामुळे अपयशाने निराश हाेऊ नका. नव्या उमेदीने पुढच्या टप्प्यासाठी सज्ज व्हा.

परीक्षा ही केवळ पुढ्या टप्प्यावर पाेहाेचण्याची पायरी असते, जी तुमचे ध्येय साध्य करण्याचे एक साधन असते. विद्यार्थी अन् परीक्षेतील त्याची कामगिरी या दोन भिन्न गाेष्टी आहेत. म्हणूनच परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हे त्यांची किंमत ठवरू शकत नाही. परीक्षेचा निकाल हा ताण आणणारा क्षण असला, तरी कित्येक तासांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची ही वेळ असते. त्यामुळे निकालाचा आनंद घ्या. प्रत्येकाच्या आयुष्याच्या वळणार परीक्षा असतात. म्हणून निकाल जाणून खूश व्हा आणि स्वत:चे यश साजरे करा.

पुढे काय करायचे याचा विचार करा!
दहावीचा निकाल लागला, आता किती गुण मिळाले, यावर चर्चा न करता पुढे काय करायचं याचा वाचार करा. गुण कितीही मिळाले असतील, पण तुमच्या समाेर अनेक संधी करिअरच्या अनेक वाटा असून, त्याकडे नव्या उमेदीने कामाला लागा.

गाेंधळ टक्केवारीचा
यंदा बहुतांश विद्यार्थ्यांना अभ्यासातील मेहनतीसाेबतच चित्रकला आणि क्रीडाचे गुण मिळाले. त्यामुळे काहींना पैकीच्या पैकी गुण मिळाले, तर काहींना ९८ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. मात्र, त्यांना केवळ अभ्यासातील मेहनतीचेच गुण मिळाले. अशा परिस्थितीत सर्वाधिक गुण काेणाला, असा गाेंधळ विद्यार्थी व पालकांमध्ये सुरू आहे.

यश हे गुणांवर नाही, तर गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे निकालाच्या गुणांवर निराश हाेऊ नका. पालकांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. पालकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य आेळखून त्या दिशेने त्याला दिशा द्यावी.
- डॉ. अनुपकुमार राठी, मनाेविकार तज्ज्ञ, अकाेला

Web Title: examination social message