पेनकिलरचा अतिवापर, करेल लाइफ पंक्‍चर

प्रशांत रॉय
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

नागपूर : डोके ठणकतयं, सर्दी झाली, हातपाय दुखत आहेत, अशा वेळी काय करावं? बस एक पेनकिलर (वेदनाशामक) घ्यायची, तत्काळ आराम आणि काम पूर्ववत सुरू... खरंच वैद्यकीय संशोधनामुळे जीवन किती सोपं झालयं. परंतु सावधान..! पेनकिलरचा जास्त डोस किंवा सवय लागली तर त्याचे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हार्ट अटॅक, स्ट्रोक यांसारख्या वेदनादायी जीवघेण्या त्रासाचाही सामना करावा लागू शकतो. वेदनेला थांबविण्याऐवजी पेनकिलर आपल्या वेगवान जीवनाला कधी पंक्‍चर करतील हे समजणारही नाही.

देशासह जगभरात सर्वांत जास्त विक्री होणाऱ्या गोळ्या, औषधांमध्ये पेनकिलर आघाडीवर आहेत. शरीराला कोणताही त्रास जाणवला की थेट मेडिकल स्टोअर्समध्ये जायचं आणि संबंधित त्रासावर पेनकिलर मागायची. फार्मासिस्ट कोणतेही आढेवेढे न घेता बिनदिक्कत तुम्हाला पेनकिलर देतो. बास.. गोळी घ्यायची अन्‌ काही क्षणांत त्या वेदनांपासून मुक्ती. यामुळे पेनकिलरची चलती आहे. परंतु मेंदूच्या कार्यात हस्तक्षेप करणार म्हणजे शरीराला काही अपाय होणारच. शेवटी हे सगळे रासायनिक घटक असतात आणि नैसर्गिकरीत्या काम करणाऱ्या शरीराच्या कार्यात मदत करत असले तरी दुष्परिणाम देतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ज्याला काही त्रास आहे किंवा रुग्ण थेट मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन वेदनाशामक गोळ्यांची मागणी करतात. डॉक्‍टरच्या "प्रिस्क्रिप्शन'शिवाय व्यक्तीने अशा गोळ्यांची मागणी करणे व फार्मासिस्टने ती पूर्ण करणे चुकीचे आहे. यासंदर्भात नियमांची काटेकोर अंमलबजावणी हवी. नागरिकांनीही सहकार्य करावे.
-नीलेश नागुलवार, केमिस्ट

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excessive use of painkillers will make life puncture