शिक्षणासाठी विद्यार्थिनीचे घरून पलायन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : घरी मुलामुलीत होणारा भेद तिच्या जिव्हारी लागत होता. दहावीनंतर शिक्षण थांबविण्याचीही भाषा घरचे करू लागले होते. कितीही अडचणी आल्या तरी मनाप्रमाणे शिक्षण घ्यायचेच, या जिद्दीतून विद्यार्थिनीने घरून पलायन केले. ती रेल्वेतून जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. व्हॉट्‌सऍपवर फोटोही मिळाला. संभाव्य धोके लक्षात घेत पोलिसांनी शनिवारी सायंकाळी नागपूर स्थानकावर पोहोचलेल्या संपर्कक्रांती एक्‍स्प्रेसमधून तिला हुडकून काढत पालकांना सूचना दिली.

शिक्षणासाठी घर सोडणारी विद्यार्थिनी बंगळुरूची राहणारी असून, दहावीत आहे. आईवडील आणि लहान भावासोबत ती राहते. तिला शिक्षणाची प्रचंड आवड आहे. परंतु, घरीच दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याची खदखद तिच्या मनात होती. त्यातच आईबाबा पुढे शिकवणार नसल्याची चर्चाही तिच्या कानावर आली. त्यामुळे घर सोडण्याचा निर्णय तिने घेतला.
शुक्रवारी घरून निघाली व रेल्वेस्थानक गाठले. मिळेल त्या गाडीत बसून गाव सोडले. रात्र होऊनही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. ती नागपूरमार्गे जाणाऱ्या संपर्कक्रांती एक्‍स्प्रेसमध्ये असल्याचे बंगळुरू पोलिसांना समजले. त्यांनी शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास लोहमार्ग पोलिसांना फोन करून विद्यार्थिनीबाबत माहिती दिली. सोबतच व्हॉट्‌सऍपवर फोटोही पाठविला. संपर्कक्रांती एक्‍स्प्रेस फलाटावर दाखल होण्यापूर्वीच पोलिस हवालदार रेड्डी, हवालदार मंगला प्रधान फलाट क्रमांक एकवर आले. गाडी येताच त्यांनी शोध सुरू केला. इंजिननंतरच्या पहिल्याच जनरल बोगीत ती दिसली. तिला ठाण्यात आणले. रेल्वे चाइल्ड लाइनच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले. त्यांनी चौकशी करून कुटुंबीयांशी संपर्क साधला. पालक येईपर्यंत तिला शासकीय वसतिगृहात ठेवले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exit student's home for education