उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचा विस्तार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भंडारा : उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्याचे क्षेत्र वाढविण्यात येणार असून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश आज वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, भंडारा जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वन राज्यमंत्री डॉ. फुके म्हणाले, उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या भोवताल अरण्य परिसर वाढत आहे. परिसरात अभयारण्य वाढल्याने या परिसरातील गावात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणे आवश्‍यक आहे. वाईसह लगतच्या तीन रिठी गावांत गावकऱ्यांना स्थलांतरित करता येईल. उमरेड, पवनी येथील साधारण 605 कुटुंबांचे पुनर्वसन 295 हेक्‍टर जमिनीत करता येइल. यासाठी संबंधित गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे स्थलांतर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी ( एस.डी.ओ) नेमण्यात यावे. यासंबंधी पुढील कारवाई करताना उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांत राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतराबाबत अधिसूचना एसडीओंनी द्याव्यात. या सुचनांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरासाठी संबंधित गावात राहणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अभयारण्य क्षेत्र अधिसुचित करून व कक्षा वाढवून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे डॉ.फुके यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension of the sanctuary to Umred-Pawani-Karhandla