फडणवीस सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी : नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : सध्याच्या फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात केवळ घोषणांचा पाऊस पाडला. त्यामुळे निसर्गाचा पाऊस कमी झाला. फडणवीस सरकारने खरच विकास केला तर मग जनतेच्या पैशाने राज्यभर महाजनादेश यात्रा का काढावी लागली? कर्जमाफी योजना फसवी ठरली. पीकविमा योजना उद्योगपतीचे घर भरणारी ठरली. नोकरीच्या नावाने बेरोजगारांची थट्टा सुरू केली. सध्याचे सरकार राज्याला अधोगतीकडे नेणारे आहे. फडणवीस सरकार सध्यातरी सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याने या सरकारला येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, असे आवाहन कॉंग्रेसचे किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसद्वारा आयोजित महापर्दाफाश यात्रेनिमित्त अर्जुनी-मोर येथे आयोजित सभेत नाना पटोले बोलत होते. पटोले म्हणाले की, अर्जुनी मोरगाव विधानसभेला भाजप सरकारच्या काळात मंत्रिपद मिळाले. मात्र, मंत्री नापास झाल्याने त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आले. विकासाच्या नावावर केवळ भूमिपूजन सुरू आहे. कॉंग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. फडणवीस सरकारने 2016 मध्ये नियम व अटी लावून कर्जमाफी केली, ती पूर्णतः अपयशी ठरली. आमच्या शेतकरी पती-पत्नींना ऑनलाइनच्या नावाने दिवस-दिवस उभे करण्याचे महापाप या सरकारने केले आहे. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी ठरली. प्रधानमंत्री पिक विमा योजना खाजगी कंपन्यांना देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. पीकविम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अंबानीच्या कंपनीला जात आहेत. बीएसएनएलला बंद करून अंबानीचा जिओ चालू केला. ही धनदांडग्यांची घरे भरणारी सरकार असल्याचे ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis government fails in all fields: Nana Patole