मेळघाटातील नागरिकांनो सावधान! तुमचे डॉक्टर बोगस तर नाहीत ना? आदिवासींच्या जीवाशी खेळ  

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612442974457,"A":[{"A?":"I","A":54.00000000000001,"B":722.9875836133954,"D":183.01241638660468,"C":51.800501053995205,"F":0.04,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM"
{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612442974457,"A":[{"A?":"I","A":54.00000000000001,"B":722.9875836133954,"D":183.01241638660468,"C":51.800501053995205,"F":0.04,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM"

जामली (अमरावती) ः बोगस डॉक्‍टरांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात एक समिती स्थापन करण्यात आली होती. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आता बासनात गुंडाळलेली दिसत आहे. कारण परप्रांतीय डॉक्‍टरांचा आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून बोगस डॉक्‍टरांचा आदिवासीच्या जीवनाशी खेळ सुरू आहे.

विशेष म्हणजे या लोकांवर ठोस तसेच कायमस्वरूपी कारवाई करण्यात येत नसल्याने त्यांचे मनोबल वाढले असून आदिवासी बांधवांवर मनासारखे उपचार करण्यासाठी ते मोकळे झाले आहेत. जेमतेम शिकलेले परप्रांतातून आलेले हे डॉक्‍टर उपचाराच्या नावावर जनतेची लूट करीत असल्याची ओरड आहे. मेळघाटसारख्या दुर्गम क्षेत्राला आरोग्य धनसंपदा बनविण्याकरिता शासनाकडून मिळत असलेल्या कोट्यवधींच्या निधीची माती या बोगस डॉक्‍टरांमुळे होताना दिसत आहे.

चिखलदरा व धारणी तालुक्‍यातील गावागावांत या परप्रांतीय डॉक्‍टरांनी आपले बस्तान मांडले असून वाटेल तसे इलाज जामली, वस्तापूर, कुलंगना, तेलखार, गिरगुटी, बिजूधावडी, टिटम्बा, हरिसाल, काटकुंभ, चुर्णी अशा गावात आरोग्य विभागाच्या डोळ्यांसमोर सुरू आहे. तरी पण आरोग्य विभाग मूग गिळून आहे. मागील काही वर्षांपासून एकही कारवाई झालेली नाही. 

हे बोगस डॉक्‍टर मूळव्याध, भगंदर सारख्या आजारांवर उपचार करतात व रुग्णांकडून नऊ ते दहा हजार रुपये वसूल करतात. तसेच साध्या सर्दी-तापाच्या रुग्णांना सलाइन व इंजेक्‍शन देऊन तीनशे ते चारशे रुपये उकळतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

बोगस डॉक्‍टरांवर कारवाईसाठी आरोग्य विभागाची टीम कार्यरत आहे. आम्हाला माहिती मिळताच कारवाई करू. या आधी बोगस डॉक्‍टरांवर कारवाई केली आहे.
-डॉ. दिलीप रणमले, 
जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com