चितळेंच्या नावाने बनावट गुलाबजाम (व्हिडिओ)

chitale
chitale

नागपूर : चितळे फूड्सचे अनेक प्रॉडक्ट प्रसिद्ध आहेत. याचाच फायदा घेऊन या नामांकित कंपनीचे नकली गुलाबजाम मिक्स विकले जात असल्याचे समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी चितळेच्या गुलाबजाम मिक्ससारखी हुबेहूब पॅकिंग असलेले नकली गुलाबजाम मिक्सची पॅकेट्स जप्त केली आहेत. ज्याठिकाणी याची निर्मिती केली जात होती तो नागपुरातील कारखानाही पोलिसांनी सील केला.

नागपूरच्या कळमना परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली . गेले काही दिवस विदर्भातील बाजारात चितळे फूड्सच्या नावाने काहीसा स्वस्त गुलाबजाम मिक्स सर्रास विकला जात होता. चितळे फूड्सच्या व्यवस्थापनाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे त्याची तक्रार दिली होती.

तक्रारीची दखल घेत पोलिसांनी चौकशी करत कळमना परिसरातील विजयनगरमधील नकली गुलाबजाम मिक्स बनवणारा कारखाना शोधून काढला. या कारखान्यात अत्यंत घाणीत हे गुलाबजाम मिक्स तयार केले जात होते. डालडा, पामोलिन तेल, दुय्यम दर्जाचा मैदा ही सामग्री वापरून मोठ्या आकाराच्या कुलरच्या टाकीमध्ये हे पदार्थ मिसळले जाते होते. त्यानंतर मशिन्सच्या मदतीने हुबेहूब चितळे फूड्सच्या इंस्टंट गुलाबजाम मिक्ससारखी पॅकिंग करुन ते बाजारात विक्रीला पाठवले जायचे.

नागपूर पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी दीपक तलरेजा यांच्यासह विक्रीत मदत करणारा जयेश लखनानी या दोघांना अटक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com