कौटुंबिक न्यायालयातून आले पुन्‍हा एकत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

पुनर्मीलन झालेल्या १०१ जोडप्यांचा सत्कार

नागपूर - दोघेही कमावते असल्यामुळे वाद व्हायचे. हा वाद घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात गेला. परत त्यालाच साथ द्यावी, असे वाटले. त्यामुळे एक दाम्पत्य पुन्हा एकत्र आले. त्यांचा सत्कार करण्यात आला. अशाप्रकारे पुनर्मीनल झालेल्या १०१ जोडप्यांचा सत्कार नागपूर कौटुंबिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय वकील संघ आणि मध्यस्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नांदा सौख्य भरे’मध्ये रविवारी (ता. सात) पार पडला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई, कौटुंबिक न्यायालयाच्या पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ई. एम. बोहरी, ॲड. शर्मिला चरलवार, ज्योती बावनकुळे, तेजस्विनी गवई उपस्थित होत्या. 

बावनकुळे म्हणाले, कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन ग्रीन बिल्डिंगसाठी नागपूरच्या अधिवेशनात संपूर्ण बजेट सादर होईल. तसेच जानेवारी २०१७ मध्ये पायाभरणी समारंभ करू. 

प्रमुख न्यायाधीश बोहरी यांनी प्रास्ताविक केले. संचालन न्यायाधीश पलक जमादार व ॲड. सुनील दावडा यांनी केले. आभार प्रदर्शन ॲड. तेजस्विनी खाडे यांनी केले. आयोजनासाठी न्या. प्रसन्न वराळे, न्या. विनय देशपांडे, सेवानिवृत्त न्यायमूर्ती रोही, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला, न्या. प्रशांत अग्निहोत्री यांनी सहकार्य केले.  

शर्मिला चरलवार यांना पुरस्कार

‘नांदा सौख्य भरे’ या विशेषांकाचे अनावरण करण्यात आले. उत्कृष्ट मध्यस्थ म्हणून शर्मिला चरलवार यांना पुरस्कार देण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाच्या उपक्रमांच्या माहितीपटाचे सादरीकरण न्यायाधीश सुभाष काफरे व न्यायालयीन व्यवस्थापक रसिका कस्तुरे यांनी केले.

संवाद वाढविणे गरजेचे

न्यायमूर्ती रेवती माहिते-डेरे यांनी आधुनिक काळाचा तंत्रज्ञान हा अभिशाप असल्याचे सांगत परस्परांमधील प्रत्यक्ष संवादाची गरज व्यक्त केली. न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, लग्नानंतर आठ दिवसांच्या आत होणाऱ्या भांडणातून घटस्फोट होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कौटुंबिक न्यायालयात झालेले पुनर्मीलन म्हणजे आल्हाददायक आहे.

Web Title: Family Court were together again