कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच!

सागर कुटे
शनिवार, 13 एप्रिल 2019

कुटुंब नियोजनाचे ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण
मागील वर्षी एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत राज्यातील कुटुंब नियोजनाचे ग्रामीण व नागरी असे एकूण ५ लाख ६५ हजारांचे उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित होते. यातील ३ लाख ३७ हजार ८०५ महिला व पुरुषांच्या म्हणजेच ६० टक्के कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

अकोला - पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून, अतिशय सोयीस्कर आहे. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना १,१०० रुपये तातडीने अनुदान दिले जाते. याउलट महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर आठ दिवस रुग्णालयातच राहावे लागते. असे असताना एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत राज्यातील ३ लाख २८ हजार ०६६ महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अवघे ९ हजार ७३९ म्हणजे उद्दिष्टापैकी १६ टक्के इतके होते. यामुळे शहरी व ग्रामीण भागातील पुरुषांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतची मानसिकता दिसून येत आहे.

स्त्री-पुरुष समानतेचा जागर करणारा शहरी व ग्रामीण भागातील पुरुष कुटुंब नियोजनाची दोरी मात्र महिलांच्या हातात देऊन नामानिराळा राहत असल्याचे 
दिसते.

Web Title: Family Planning Woman