मजुराला होणाऱ्या विषबाधेची जबाबदारी आता शेतमालकावर - कृषी विभाग

विनोद इंगोले
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नागपूर : सुरक्षा साधनांचा वापर न करता मजूराने फवारणी केल्यास आणि त्यामुळे त्यांना विषबाधा झाल्यास याची जबाबदारी थेट शेतमालकावर निश्‍चीत करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. अशाप्रकरणात यापुढे आता थेट शेतमालकावर कारवाई प्रस्तावीत केली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

नागपूर : सुरक्षा साधनांचा वापर न करता मजूराने फवारणी केल्यास आणि त्यामुळे त्यांना विषबाधा झाल्यास याची जबाबदारी थेट शेतमालकावर निश्‍चीत करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. अशाप्रकरणात यापुढे आता थेट शेतमालकावर कारवाई प्रस्तावीत केली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात गेल्यावर्षी फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधा आणि
मृत्यूंमुळे देशभरात खळबळ उडाली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या
पथकाने देखील या घटनांची दखल घेत यवतमाळसह राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर विविध समित्यांचे गठण करण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालात विषबाधेमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शेतमालकाने फवारणी करणाऱ्या मजूराकडे तो या कामासाठी शारिरीकदृष्टया सक्षम असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करावी, या शिफारसीचा देखील समावेश आहे. फवारणी करणाऱ्या मजूराने सेफ्टी किटमधील साहित्याचा देखील वापर करण्याच्या सुचना आहेत. 

विषबाधेमुळे यावर्षी एक मृत्यू आठ दाखल वाशीम जिल्हयातील एका मजूराचा यावर्षी फवारणी दरम्यान विषबाधा होऊन मृत्यू झाला. त्यासोबतच यवतमाळ जिल्हयात आठ जण फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याच्या कारणामुळे दाखल झाले आहेत. त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णायालत उपचार सुरु आहेत.

"विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी थोड्याशा सुरक्षाविषयक शिफारसींकडे
लक्ष्य देणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून लाखमोलाचे जीव वाचविता येतील. परंतु अनेक ठिकाणी सुरक्षाविषयक शिफारसी दुर्लक्षीत होतात. त्यामुळे यापुढे अशाप्रकारात शेतमालकावर जबाबदारी निश्‍चीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
- विजय कुमार, मुख्य सचिव (कृषी)

Web Title: farm owner is responsible for workers poisoning said agricultural department