शेतकरी अपघात विम्याचे तीनतेरा!

File photo
File photo

शेतकरी अपघात विम्याचे तीनतेरा!
नागपूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी विमा योजना सुरू केली. गेल्या दोन वर्षांत प्रशासनाकडे आलेल्या अर्जापैकी निम्म्या लोकांनाही याचा लाभ मिळाला नाही. मंजूरपेक्षा प्रलंबित अर्जांची संख्या दुप्पट आहे.
सरकारकडून या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात येत असला तर प्रशासनाने याचे तीनतेरा वाजविल्याचे चित्र आहे.
फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आत्महत्या रोखण्यासोबत त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न होत आहे. शेतीमालाला भावही वाढवून देण्यात आले आहे. शेतात काम करणाराच घरातील कर्ता व्यक्ती असतो. शेतात काम करताना साप चावून, वीज पडून किंवा अन्य कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्यास मदत म्हणून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यात येते.
नागपूर विभागात म्हणजे नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या सहा जिल्ह्यांतून 1 डिसेंबर 2016 ते नोव्हेंबर 2018 दरम्यान 704 अर्ज कृषी विभागाकडे आले. या पावणेदोन वर्षांच्या काळात फक्त 219 अर्जच मंजूर करण्यात आले. तर 72 अर्ज नामंजूर करण्यात आले.  
वर्षभरापासून अर्ज प्रलंबित
सरकारकडून शासन, प्रशासन गतिमान असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, या योजनेअंतर्गत सव्वातीनशेवर अर्ज अद्याप प्रलंबित आहे. विशेष म्हणजे मागील वर्षातील (2017) 180 वर अर्ज प्रलंबित आहे. वर्षभरापासून अर्ज प्रलंबित असल्याचे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आर्थिक कारणासाठी अर्ज प्रलंबित ठेवण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर 2018 मधील सव्वा दोनशे अर्ज प्रलंबित आहे.
जिल्हा अर्जाची संख्या प्रलंबित मंजूर नामंजूर
नागपूर 137 64 51 22
वर्धा 76 46 19 11
भंडारा 103 59 12 10
गोंदिया 126 71 46 9
चंद्रपूर 163 114 37 12
गडचिरोली 99 59 32 8

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com