कृषी कायद्याविरोधात यवतमाळमध्ये आंदोलन, ट्रॅक्टर मोर्चासह शेतकऱ्यांचा ठिय्या

farmer agitation against agriculture act in yavatmal
farmer agitation against agriculture act in yavatmal

यवतमाळ : कृषी विधेयकाला विरोध करीत हरियाणा, पंजाब व राजस्थान येथील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे पडसाद यवतमाळ शहरासह जिल्ह्यात उमटले आहेत. शेतकरी संघटनेने जागर आंदोलन केले, तर शुक्रवारी (ता.चार) शेतकरी पुत्र संघर्ष समितीने ट्रॅक्‍टर मोर्चा काढीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. महागाव येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

अत्यावश्‍यक वस्तू व सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक व करारशेती विधेयक अशी तीन नवीन विधेयके आहेत. या विधेयकांचा परिणाम देशातील शेतकऱ्यांवर होणार आहे. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. कृषी विधेयक रद्द करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. बोंडअळीच्या प्रकोपाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.चार) संघर्ष समितीने डेरा आंदोलन केले. यासाठी वडगाव येथील बिरसा मुंडा पुतळा येथून मोर्चा काढत संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे चंद्रशेखर चौधरी, अशोक महल्ले, नितीन मिर्झापुरे, उमेश इंगळे, अंकुश वानखडे, अतुल राऊत, अरुण ठाकूर, घनश्‍याम अत्रे, प्रदीप डंभारे, अजय गावंडे, अजय किन्हीकर, कृष्णा पुसनाके, सूरज खोब्रागडे, शुभम लांडगे, दत्ता हाडके, ऍड. दिनेश वानखडे, राहुल राऊत यांच्यासह शेतकरी पुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांनी वेधले लक्ष -
शेतकरी पुत्र संघर्ष समितीने बुधवारी (ता.दोन) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी (ता. चार) हा ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्यात आला. गेल्या वर्षभरानंतरचा हा पहिल्याच ट्रॅक्‍टर मोर्चा यवतमाळ शहरात काढण्यात आल्याने मोर्चेकऱ्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शेतकरी पुत्रांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. यावेळी संविधान चौकात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com