Akola : शेतीचे भवितव्य होतेय अंधकारमय

युवकांचे दुर्लक्ष,नोकरीच्या शोधात शहराकडे कल
farmer
farmersakal

शिरपूर जैन : भारत देश हा कृषिप्रदान म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे येथे शेतीला अधिक महत्त्व आहे,तर बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय करतात.शेतीला बाधक ठरणाऱ्या अतिवृष्टी व जास्त पावसाळी वातावरण तसेच पावसातील खंड यामुळे शेतकरी वर्ग हताश होताना दिसत आहे.त्याचप्रमाणे शेतकऱ्याला आपल्या पिकवलेल्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नाही.

शिवाय आजची शेती ही खर्चिक झाली आहे. पारंपरिक अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलांची जोडी तर नावालाच उरली आहे. ट्रॅक्टर,विविध आधुनिक अवजारे ,तणनाशक, खते,फवारणी खर्च यामुळे शेती व्यवसाय भरकट आहे.याला कंटाळून युवा वर्ग आपल्या पारंपरिक शेतीकडे वळण्या ऐवजी नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे. तेव्हा शेती व्यवसाय अंधकारमय विश्वात जात आहे.

आजकाल आधुनिकीकरण वाढले आहे,पारंपरिक शेती व्यवसायात आधुनिक यंत्र सामुग्रींने केलेली प्रगती पाहता शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. आजकालच्या शेती लागवड व मशागतीसाठी लागणारा खर्च, रासायनिक खते, कीटकनाशके, अधिकाधिक पीक देणारी बी-बियाणे,मजुरांची वानवा, त्यांची मजुरी देणी यामुळे शेतीच्या खर्चात भरपूर वाढ झाली असून त्या बदल्यात मिळणारे उत्पन्न मात्र कमी असून, हमीभाव याची शाश्वती देता येत नाही.

शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने लागवडीचा खर्चही निघणे कधी कठीण होते.उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत आहे. शिवाय या व्यवसायात आधुनिकीकरण वाढले.सध्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. शेतीच्या मशागतीसाठी व श्रमाच्या कामांसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर सारख्या यंत्राचा उपयोग वाढला आहे.

आधुनिकीकरणाच्या दुनियेत लाकडी नांगर,फाळ, कुदळ, फावडा, टोपली आदी पारंपरिक साधने मागे पडू लागली आहेत. बळीराजाना परवडत नसल्याने बैलजोड्यांकडे पाठ फिरविल्याने पारंपरिक आपली कृषी संस्कृती धोक्यात येत आहे. शेतीची संपूर्ण कामे आता यंत्रद्वारेच होत आहेत. शेती आता वेगात,सोपी व जलद होत असल्याचे चित्र सर्वच शेतशिवारात पाहायला मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com