अकोला :शेतकऱ्याचा तहसील कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

अविनाश बेलाडकर
सोमवार, 15 मे 2017

या शेतकऱ्याला शेतीची नाेंद करून देण्यासाठी त्रास दिला जात हाेता. आज ताे सातबारा मागायला आला. मात्र त्याला उशीर झाल्याने त्याने तहसील कार्यालयाबाहेर जावून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

अकोला - मुर्तिजापूर तालुक्यातील चिखली येथील शेतकरी वासुदेव आकाराम राऊत या शेतकऱ्याने आज (साेमवार) सकाळी पावणेबाराच्या सुमारास तहसील कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी धाव घेत त्याला थांबवल्याने अनर्थ टळला.

या शेतकऱ्याला शेतीची नाेंद करून देण्यासाठी त्रास दिला जात हाेता. आज ताे सातबारा मागायला आला. मात्र त्याला उशीर झाल्याने त्याने तहसील कार्यालयाबाहेर जावून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी धाव घेत त्याला अडवले. त्यामुळे अनर्थ टळला.

तहसीलदार राहूल तायडे यांनी घटनेची दखल घेत शेतकऱ्याला तत्काळ सातबारा उपलब्ध करून दिला.

Web Title: farmer attempt suicide in Akola