कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नेर (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील आजंती बेड्या येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

नेर (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील आजंती बेड्या येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
प्रकेश प्रकाश राठोड (वय 24) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे आहे. प्रकेश शेतात काम करण्यासाठी गेला होता. मात्र, डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर दूर कसा करायचा याची चिंता त्याला सतावत होती. त्यातूनच त्याने आज दुपारी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी प्रकेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता, तो गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती कळताच नेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शेतकरी राठोड यांच्याकडील चार एकर शेतीवर भारतीय स्टेट बॅंकेचे कर्ज असल्याची माहिती आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी व एक मुलगा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer commited suicide