नापिकी, कर्जापायी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

चिमूर : चिमूर तालुक्यातील वाहानगाव येथील शेतकरी मधुकर विठोबा थुटे (वय 70) यांनी आज सकाळी नऊ वाजता दरम्यान शेतातील विहिरीत नापिकी आणि सावकारी कर्जामुळे शेतातील विहीरीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे.

शेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वहानगाव येथील वृद्ध शेतकरी मधुकर विठोबा थुटे सकाळी नियमीतपणे शेताकडे गेले व गावापासुन अंदाजे एक किलोमीटर असलेल्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

विहिरीवर कोळश्याने कर्ज बाजरीपणा व नापिकीमुळे आत्महत्या करीत असल्याचा मजकूर लिहून ठेवला असून यात कुणाचा दोष नाही आहे असे लिहिले आहे. घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली आहे घटना  गावकऱ्यांनी घटना स्थळावर गर्दी केली आहे.

Web Title: farmer commits suicide in chimur