शेतकऱ्यांसाठीची ‘कासोधा’ परिषद दडपण्याचा डाव

Kasodha
Kasodha

अकोला : अकोला येथे आज (मंगळवार) शेतकऱ्याच्या विविध मागण्या आणि ज्वलंत प्रश्नांसाठी आयोजित करण्यात आलेली दुसरी ‘कासोधा’ परिषद दडपण्याचा डाव पोलिस व सरकार यांनी आखला असून, त्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते आणि या परिषदेत सहभागी होण्याची शक्यता असलेल्यांना पोलिसांनी नोटीसा पाठवून ‘कासोधा’ परिषदेस उपस्थित राहू नये यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे.

दरम्यान, मंगळवारी अकोल्याच्या स्वराज्य भवनाच्या प्रांगणात होऊ घातलेल्या या परिषदेस अनेक दिग्गजांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, मोर्चे, रास्ता रोको आंदोलन यासारखे प्रकार होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते.

यासाठी पोलिसांनी या परिषदेस उपस्थित राहण्याची शक्यता असलेल्यांना कलम १४९ सीआरपीसी अन्वये नोटीस पाठवून दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com