पीककर्जाअभावी शेतकऱ्यांची दैना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

अकोला - राज्यात सर्वत्र 10 जूनपर्यंत जोरदार पावसाचे संकेत आहेत. यामुळे लवकरच पेरण्या सुरू होतील, अशी शक्‍यता गृहीत धरली जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू असताना त्यांच्या हातात बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत. मशागत, पेरणीचे पैसे चुकवायचे कसे असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. कर्जमाफी झालेल्यांनाही नवीन पीककर्ज मिळालेले नाही. 

पावसाच्या आगमनामुळे या हंगामाची सुरवात चांगली झाली आहे. येत्या 10 जूनपर्यंत मॉन्सून सगळीकडे सक्रिय होण्याचा अंदाज असल्याने शेतकरी एकीकडे आनंदलेला असताना दुसरीकडे मात्र पेरणीला लागणारे बी-बियाणे, खते खरेदीसाठी त्याच्या हातात दमडीही नाही. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्यांच्या खात्यात शासनाच्या रकमा जमा झाल्या नसल्याने बॅंका नवीन पीककर्ज देताना हात आखडता घेत आहेत. काहींच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा झाली असली, तरी कागदपत्रांच्या अडचणी, बॅंकांमध्ये सर्व्हर डाऊन होणे, कर्मचाऱ्यांच्या तुटवडा ही कारणे भोवत आहेत. असंख्य बॅंक शाखांमध्ये दिवसाला केवळ 15 ते 20 प्रकरणे हातावेगळी करत आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाखांमध्ये सध्या सर्वत्र गर्दी बघायला मिळते आहे. असंख्य शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी ही अजूनही त्यांच्या बॅंक खात्यात जमा झालेली नाही. ज्यांची झाली त्यांच्या याद्यांबाबत गोंधळ आहे. 

येथे तुम्हाला कर्ज मिळणार नाही! 
कर्जमाफीनंतर काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी मोठी चलाखी केली आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आणि आता ज्यांना माफी मिळाली, अशांची खाती निल होऊनही या हंगामासाठी नवीन कर्ज देण्यास नकार दिला आहे. आता तुमचे गाव आमच्या शाखेशी पीककर्जासाठी जोडलेली नाही, तुम्ही दुसऱ्या बॅंकेकडे अर्ज करा, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे सुचविलेली बॅंक शाखाही आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही, असे सांगून मोकळी होत आहे. 

Web Title: farmer Crop loan issue