आंदोलनात शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

कळमना - दुधाला अधिक भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी नागपुरात आंदोलन करताना शेतकरी शरद खेडीकर यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. ते जय जवान, जय किसान संघटनेचे उपाध्यक्ष होते. नागपुरात जय जवान, जय किसान संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन आज सकाळी आयोजित केले होते. या वेळी अनेक ठिकाणी दुधाचे मोफत वाटप करून, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यांवर फेकून केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध केला. 

शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा, या प्रमुख मागणीसह देशभर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत गावातून शेतमाल, भाजीपाला व दूध शहरांमध्ये न पाठविण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपुरात आज सकाळी कळमना भागातील प्रजापतीनगरात शेतकऱ्यांनी दूध फेकून सरकारचा निषेध व्यक्त केला तसेच अनेकांना दुधाचे मोफत वितरण केले. 

शरद खेडीकर हे जय जवान, जय किसान या संघटनेचे उपाध्यक्ष होते. यामुळे आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. काही वेळ येथे तणाव निर्माण झाला होता. 
सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या ७ जूनला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन केले जाणार आहे. येत्या ७ जूनपासून नागपुरात येणारे दूध, भाजीपाला व इतर शेतीमाल नागपूर शहराच्या सीमेवर रोखण्यात येईल, असा इशारा जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला आहे. या आंदोलनात विदर्भातील अनेक शेतकरी सहभागी होणार आहेत.

हृदयविकाराचा झटका
केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन सुरू असताना शरद खेडीकर या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले; परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. 

Web Title: Farmer death in agitation farmer agitation milk rate