फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

अनिल दंदी
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

अकोला : बाळापूर तालुक्यातील गायगाव येथील तरुण शेतकऱ्याचा पिकाला फवारणी करतांना विषबाधा होऊन मृत्यु झाल्याची घटना घडली. रविवारी (ता. 12) सायंकाळी हि घटना घडली असून आज सकाळी अकरा वाजता गायगाव येथे शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गायगाव येथे वास्तव्यास असलेल्या राजू नामदेव राऊत (वय 32) हे शनिवारी (ता. 11) शेतात पिकावर फवारणी करत होते. मात्र, फवारणी करुन घरी आल्यावर सायंकाळी सहाला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना उलटी झाली. घरी प्रथमोपचार केला. मात्र प्रकृती जास्तच खालावली होती. त्यांना उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारा दरम्यान रविवारी राजू राऊत यांना मृत्यू झाला.

Web Title: farmer dies after Spraying Pesticide