वाघिणीच्या हल्ल्यात शेतकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

न्यू बोर अभयारण्यातील उमरविहिरी क्षेत्रातील घटना
कारंजा (घा) (जि. वर्धा) : तालुक्‍यातील धानोली येथील शेतकरी शेतातून जंगलाच्या काठाने परत येत असताना त्याच्यावर अचानक वाघिणीने हल्ला केला. यात शेतकरी जागीच ठार झाला. वाघिणीने या शेतकऱ्याला जंगलात फरपटत नेल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. विठोबा दसरू वडुले (वय 57) रा. धानोली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

कारंजा वनपरिक्षेत्रातील धानोली उपवनाच्या उमरविहिरी वनकक्ष क्रमांक 49 लगतच्या परिसरात ही घटना घडली. याची माहिती वनविभागाला मिळताच न्यू बोर अभयारण्य वनपरिक्षेत्राधिकारी जी. एस. राठोड घटनास्थळी दखल झाले. पंचनामा करून मृताच्या कुटुंबाला पन्नास हजारांची मदत केली. या घटनेमुळे मेठहिरजी, धानोली या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
विठोबा वडुले सकाळी शेतीकामानिमित गेले होते. शेतकाम आटोपून घरी येत असताना वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. वडील घरी परत आले नसल्याने मुलगा शेषराव हा शेतात गेला. काही अंतरावर एका झाडाखाली वडिलांचा मृतदेह आढळला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer killed in tiger attack