esakal | चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मध्य चांदा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या विरुर वन परिक्षेत्रात नवेगाव येते. याच परिसरात गोविंद मडावी यांची शेती आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे गोविंदा मडावी शेतात काम करीत होते. दुपारी तीन वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजरा तालुक्यात शनिवारी (ता. २६) घडली.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी

sakal_logo
By
श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : शेतात काम करीत असतानाच वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. ही घटना मध्य चांदा वनविभागांतर्गत येत असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर वनपरिक्षेत्र नवेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १४५ मध्ये शनिवारी (ता. २६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

गोविंदा भीमराव मडावी, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मागील सहा महिन्यांपासून या परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत सहा जणांचे बळी वाघाने घेतले.

मध्य चांदा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या विरुर वन परिक्षेत्रात नवेगाव येते. याच परिसरात गोविंद मडावी यांची शेती आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे गोविंदा मडावी शेतात काम करीत होते. दुपारी तीन वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. बराचवेळ लोटून मडावी आले नसल्याचे पाहून त्यांच्या घरच्यांनी शेत गाठले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

काही महिन्यांपूर्वीच याच गावातील वासुदेव कोंडेकर या शेतमजुराचा बळी वाघाने घेतला होता. मागील सहा महिन्यांपासून राजुरा व विरुर वनक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत सहा जणांचा वाघाने बळी घेतला आहे. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची चमू रात्रंदिवस जागरण करीत आहे. मात्र, वाघ वनकर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जाणून घ्या  : आजारातून बरे होण्याची संपूर्ण यंत्रणा आपल्या शरीरातच! जाणून घ्या कोविड रुग्णांसाठी प्राणायाम

वाघाची प्रचंड दहशत

विशेष म्हणजे, मागील सहा महिन्यांपासून राजुरा व विरुर वनक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला आहे. तरीही वनविभागाने दखल घेतली नाही. वाघाने आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतला आहे. यामुळे या भागात वाघाची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा :  नुकसानच नुकसान! पश्‍चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या नशिबी यंदा ओला दुष्काळ

नागरिकांत संताप व्यक्त

वाघाला त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे चमू रात्र दिवस जागरण करीत असूनही वाघ मात्र वन कर्मचाऱयाच्या तावडीत सापडला नसल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वाघाला ठार माराच अशी आग्रही मागणी केली जात आहे.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image
go to top