शेतकऱ्यांना हवेत नितीन गडकरी

Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर - रस्ते बांधकामाच्या माध्यमातून दळणवळणाला गती देण्यासोबतच औद्योगिक विकास साधण्यात यशस्वी ठरलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा कारभार सोपविण्याची मागणी होत आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गेल्या टर्ममधील कामाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. नदी जोड प्रकल्प, सिंचन प्रकल्पाकरिता निधीची उपलब्धता, रस्त्याची देशभरात दर्जेदार कामे, गंगा सफाई अभियान, जल वाहतूक क्षेत्रातही त्यांनी आपली छाप सोडली. 

मोदी सरकारमधील हेवीवेट नेते अशी त्यांची ओळख आहे. त्यासोबतच त्यांच्या कामाचा आवाका पाहता त्यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा प्रभार सोपवावा, अशी मागणी खुद्द शेतकऱ्यांमधूनच होत आहे. गेल्या अनेक वर्षांत कृषी क्षेत्रात आलेली मरगळ गडकरीच दूर करू शकतील, अशी अपेक्षादेखील शेतकऱ्यांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com