वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लढवली शक्कल 

भुपेश बारंगे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

शेतकऱ्यांनी शेतातील पिकाचे संरक्षण होण्यासाठी वन्यप्रान्यासाठी लावले पंखे धामकुंड येथील रवीचंद रवकाळे, वासुदेव रवकाळे, गौरव शाहू या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भंगार साहित्यातून बनविलेले पंखे लावण्या आले आहे. त्यामुळे शेतात वन्यप्राणी येताना दिसत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. हाच उपाय शेतकऱ्यांनी केला तर शेतकऱ्याचा शेतातील पिकाचे नुकसान होणारे थांबवू शकते.

कारंजा (घा) : तालुक्याच्या परिसर मोठ्या प्रमाणात जंगलाने व्यापला असल्याने अनेक गावातील शेतकरी शेतातील पिकाच्या वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे त्रासून गेले आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी गावे, शेती जंगल परिसराला लागून असल्याने शेतात वन्यप्राण्याचा हैदोस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी त्रासाला असल्याने वनविभागाकडून पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. शेतातील पीक वन्यप्राण्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी शेतकरी अनेक प्रकारे शक्कल लढवून वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्याच्या धडपडीत करत आहे. शेताच्या काठाने कुंपण केले तरी त्यातूनही वन्यप्राणी सहज शेतात शिरत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, यासाठी आता शेतकऱ्यांनी नवीन शक्कल लढवली आहे.

धामकुंड येथील धनराज कालभुत यांचा मुलगा मंगेश कालभुत या शेतकऱ्याने चक्क शेतात भंगार साहित्य आणून फंखे तयार केले आहे. तर शेताच्या जंगल परिसराच्या काठाने भंगार साहित्य वापर करून पंखा तयार केला आहे. पंखा फिरताना त्याच्या खाली घरातील कोपराचे भांडे लावले आहे. त्यानंतर हवा सुरू झाल्याने तो पंखा त्या कोपराला स्पर्श केल्याने आवाज तयार होतो. जेव्हा जोरदार हवा असली की मोठ्या आवाज होतो. त्यामुळे शेतात आलेले वन्यप्राणी येताना दूर पळतात, तर शेतात शिरलले वन्यप्राणी पळून जातात. त्यामुळे शेतातील पिकाची नासाडी होत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. तर आणखी शेतात बॅटरीवर चालणारे टेपरेकॉर्डर लावण्यात आला आहे त्यातून गाणे लावते रात्रभर शेतात गाणे लावले जाते.

तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी वन्यप्राण्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. रात्रीला शेतात शेतात जीव मुठीत घेऊन जागलीला (रखवाली)जावे लागते. अनेक शेतकऱ्यावर वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याने शेतकरी जखमी होतात. धामकुंड येथे शेतात लावण्यात आलेलं भंगार साहित्यातील पंख्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात रखवालीसाठी जावे लागत नाही असे शेतकरी सांगत आहे.

शेतकऱ्यांनी शेतातील पिकाचे संरक्षण होण्यासाठी वन्यप्रान्यासाठी लावले पंखे धामकुंड येथील रवीचंद रवकाळे, वासुदेव रवकाळे, गौरव शाहू या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भंगार साहित्यातून बनविलेले पंखे लावण्या आले आहे. त्यामुळे शेतात वन्यप्राणी येताना दिसत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. हाच उपाय शेतकऱ्यांनी केला तर शेतकऱ्याचा शेतातील पिकाचे नुकसान होणारे थांबवू शकते.

Web Title: farmer saves crops for animal in Wardha

टॅग्स