मुख्यमंत्र्यांसोबतच्या संवादाचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नागपूर - शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत नागपूर विभागात पाटणसांगवी (जि. नागपूर), कांढळी (जि. वर्धा) व मूल (जि. चंद्रपूर) या तीन ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे.

या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादाला उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. 

कार्यशाळेतील शेतकऱ्यांना या व्हिडिओ संवादाबाबत कुतूहल होते. केवळ कार्यशाळेतील शेतकरीच नव्हे, तर गावातील काही उत्साही शेतकरीही या वेळी आवर्जून उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना अनेक शेतकरी त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे टिपून घेत होते. मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनानंतर उत्साह आला व हे प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या एकूणच विचारप्रक्रियेवर क्रांतिकारी सकारात्मक बदल करणारे ठरेल, अशी भावना या संवादानंतर अनेक शेतकऱ्यांनी या वेळी व्यक्त केली. संवादानंतर शेतकऱ्यांचे वेगवेगळे गट त्यांच्या भाषणावर व त्यातील मुद्द्यांवर चर्चा करीत असताना दिसले.

स्वतः मुख्यमंत्री या योजनेविषयी गंभीर आहेत. आज त्यांनी आमच्याशी साधलेला संवाद आम्हाला हिंमत देणारा आहे. गटशेतीवर अलीकडच्या काळात देण्यात येत असलेला भर या प्रशिक्षणाने अधिक दृढ होईल. 
- पांडुरंग नौकरकर, शेतकरी, विखणी (जि. वर्धा)

प्रशिक्षण कार्यक्रमातून गटशेतीबद्दल मोलाची माहिती मिळाली. प्रशिक्षणासाठी आलेल्या शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्त्व कळले आहे. गावातील शेतकऱ्यांना गटशेतीसाठी प्रवृत्त करू.
- ललिता वहाणे, सरपंच, भेंडाळा (जि. नागपूर)

शेतीशी उद्योजकतेचा संबंध जोडण्याची संकल्पना स्वागतार्ह आहे. या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान व ज्ञानाचे आदानप्रदान होईल व एकत्रितपणे शेती समस्यांशी सामना करता येईल.
- सुनील कोपरकर, शेतकरी, परसोडी (जि. वर्धा)

Web Title: Farmer Skill Development Training Chief Minister Discussion