ढोरखेड्याचे शेतकरी संपावर जाणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मालेगाव - ढोरखेडा (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथे सरपंच सुनीता मिटकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांनी संपाचा निर्धार करीत शेतीच्या औजारांचा त्याग करण्याचा संकल्प केला.

मालेगाव - ढोरखेडा (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथे सरपंच सुनीता मिटकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांनी संपाचा निर्धार करीत शेतीच्या औजारांचा त्याग करण्याचा संकल्प केला.

एकीकडे महागाईने शेतकरी होरपळत असताना शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. यामुळे संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतमालाला भाव नसल्यामुळे पेरण्यासाठी बी-बियाणे, खत कसे आणावे, या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यामुळे कुटुंबाला पुरेल एवढेच उत्पादन घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. सुनीता मिटकरी यांनी हा ठराव काल ग्रामसभेत मांडला. आज गावात शेतकरी, शेतमजूर यांची सभा झाली. या सभेत शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्धार कायम ठेवला.

Web Title: farmer strike