शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या नावे केली शेती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

दर्यापूर (जि. अमरावती) ः स्थानिक साईनगर रहिवासी प्रमोद कुटे हे अल्पभूधारक शेतकरी असून नियमित कर्जभरणा करतात. मागील वर्षी त्यांनी 81 हजार रुपयांचे कर्ज काढले होते. कर्ज माफ होण्यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे तीन पत्रे पाठविली. यासाठी त्यांचा मागील दहा महिन्यांपासून प्रशासनाशी लढा सुरू आहे. मात्र, काहीच कार्यवाही न झाल्याने त्यांनी आता आपली जमीन मुख्यमंत्र्यांच्या नावे करून मुलाबाळांसह पत्नीच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी व इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

प्रसारमाध्यमांद्वारे याबाबतच्या बातम्या प्रसारित होताच या शेतकऱ्याच्या आर्थिक अस्वस्थेबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. या विषयावर माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी (ता. 14) दर्यापूर येथे कुटे यांच्या घराला भेट दिली. या भेटीत त्यांनी या शेतकऱ्याला निराशेने खचून न जाता लढा कायम ठेवण्यास व कुटुंबाला आधार देण्यास सांगितले. ही लढाई आपण मिळून लढू, असा विश्‍वासही पटोले यांनी कुटे यांना दिला.
कर्जमाफी फसवी
नाना पटोले यांनी भाजप सरकारला धारेवर धरत फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवेगिरी असल्याचा आरोप केला. पत्रव्यवहार करूनही राज्याचे मुख्यमंत्री शेतकरी प्रमोद कुटे यांच्यासोबत साधी बोलण्याची तसदी घेत नसतील व शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नसतील तर मुख्यमंत्र्यांचा निषेध केला पाहिजे, असे सांगत कुटे यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून विधानसभेतही सरकारला धारेवर धरू, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. या वेळी नंदकिशोर कुयटे, राजेंद्र पारिसे, राजू तायडे उपस्थित होते.

Web Title: Farmer sucide permission news